
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. ७ ऑक्टोबर २०२४ | फलटण |
पुणे येथे मोतीबागमध्ये फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून इच्छुक असलेले उमेदवार श्री. बापूसाहेब जगताप यांनी रविवारी भेट घेऊन निवडणुकीसंदर्भात आपले परिचयपत्र खा. शरद पवार यांच्याकडे सुपूर्द केले.
पवारांनी त्यांचे परिचयपत्र कटाक्षपणे पाहून फलटण तालुक्यातील घडामोडींवर विचारणा केली. यावेळी पिंपरी-चिंचवड येथील श्री. आझमभाई पानसरे यांनी पवार यांना फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून बौद्ध समाजातील उमेदवार दिल्यास महाराष्ट्र राज्यात चांगला ‘मेसेज’ जाईल, असे हक्काने सागितले.
भेटीवेळी श्री. नंदकुमार मोरे, श्री. बाळासाहेब खलाटे, श्री. प्रदीप जगताप व श्री. शुभम गुंजाळ उपस्थित होते.
