नायलॉन मांजा विक्री व वापरास बंदी


दैनिक स्थैर्य । दि. १४ जानेवारी २०२३ । सातारा । प्लॅस्टिक किंवा कृत्रिम वस्तूंच्या वापर करुन बनविण्यांत आलेल्या व सर्वसाधारणपणे “ नॉयलॉन मांजा ” या नावांने परिचित असलेल्या पक्क्या धाग्यामुळे पक्षी व मानव जिवितांस इजा पोहोचली जाते. काही प्रसंगी त्या इजा प्राणघातक ठरतात.

निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत आवटे यांनी पर्यावरण (संरक्षण) कायदा १९८६ च्या कलम ५ मधील तरतूदीनुसार व निर्देशाच्या अनुषंगाने खालीलप्रमाणे आदेश दिले आहेत.

प्लॅस्टिक किंवा कृत्रिम वस्तूंचा वापर करुन बनविण्यांत आलेल्या व सर्वसाधारणपणे “ नायलॉन मांजा ” या नावांने परिचित असलेल्या पक्क्या धाग्याचा वापर मकरसंक्रांत या सणाच्या वेळी पतंग उडविण्याच्या तसेच इतर वेळी करण्यास त्याचप्रमाणे नायलॉन मांजा/धाग्याची निर्मिती, विक्री, साठवणूक व वापर करण्यांस संपूर्ण सातारा जिल्हयात कायमस्वरुपी बंदी घालण्यांत येत आहे.

संपूर्ण सातारा जिल्हयातील उत्पादक, घाऊक व्यापारी, किरकोळ व्यापारी, साठवणूकदार यांना नायलॉन मांजाचे उत्पादन, साठवणूक व विक्री करण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे.


Back to top button
Don`t copy text!