बाळशास्त्री जांभेकरांच्या तीन दिवसांची अचूक नोंद घ्या; रविंद्र बेडकिहाळ यांचे आवाहन

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दिनदर्शिकांमध्ये बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती, पुण्यतिथी आणि पत्रकार दिनाची अचूक नोंद करण्याचे आवाहन रविंद्र बेडकिहाळ यांनी केले आहे.

स्थैर्य, फलटण, दि. 22 नोव्हेंबर : मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक ‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांच्याशी संबंधित तीन महत्त्वाच्या दिवसांची दिनदर्शिकांमध्ये अचूक नोंद करावी, असे आवाहन महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष तथा बाळशास्त्री जांभेकर स्मारक प्रकल्पाचे प्रमुख रविंद्र बेडकिहाळ यांनी केले आहे. वृत्तपत्रे, वृत्तसंस्था आणि दिनदर्शिका प्रकाशकांनी या तिन्ही तारखांचा योग्य उल्लेख करून ऐतिहासिक माहिती जपावी, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

६ जानेवारीबाबत होणारी चूक टाळण्याचे आवाहन

जांभेकर यांची २० फेब्रुवारी रोजी जयंती आणि १७ मे रोजी पुण्यतिथी असते. तर ६ जानेवारी १८३२ रोजी त्यांनी ‘दर्पण’ हे मराठीतील पहिले वृत्तपत्र सुरू केल्याच्या स्मरणार्थ ६ जानेवारी हा दिवस ‘मराठी पत्रकार दिन’ म्हणून पाळला जातो. अनेकदा ६ जानेवारीला त्यांची जयंती असल्याचा चुकीचा उल्लेख होतो, मात्र तो त्यांचा जन्मदिन नसून दर्पण सुरू केल्याचा दिवस असल्याने ही चूक टाळणे गरजेचे आहे.

शासकीय यादीचा दाखला आणि प्रकाशकांना विनंती

महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या पाठपुराव्यानंतर अजित पवार यांच्या माध्यमातून शासनाच्या जयंती अभिवादन यादीत २० फेब्रुवारी या जांभेकर जयंतीचा समावेश करण्यात आला. त्यानुसार सर्व शासकीय कार्यालयांमध्ये अभिवादन केले जाते. त्याच धर्तीवर सर्व प्रकाशकांनी २० फेब्रुवारी जयंती, १७ मे पुण्यतिथी आणि ६ जानेवारी मराठी पत्रकार दिन (दर्पण दिन) अशा नोंदी करून नव्या पिढीपर्यंत योग्य माहिती पोहोचवावी, असे बेडकिहाळ यांनी म्हटले आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!