आयुर कंपनी राज्यात नावलौकिक कमावेल : विजयसिंह मोहिते पाटील


स्थैर्य, फलटण, दि.२५: येथील आयुर ऑल इन वन कंपनी आगामी काळामध्ये संपूर्ण राज्यात नावलौकिक कमावेल असा विश्वास माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी व्यक्त केला.

गिरवी, ता. फलटण येथे आयुर ऑल इन वन कंपनीच्या शॉपला माजी उपमुख्यमंत्री व माजी खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांनी सदिच्छा भेट दिली. त्यावेळी विजयसिंह मोहिते पाटील बोलत होते. या वेळी युवा नेते दिगंबर आगवणे, पंचायत समिती सदस्या सौ. जयश्री दिगंबर आगवणे यांच्यासह आयुर कंपनीचे संचालक उपस्थित होते.

आयुर ऑल इन वन कंपनीच्या माध्यमातून सर्वसामान्य ग्राहकांना ज्या सुविधा पुरवण्यात येत आहेत, त्या सुविधा मोठमोठ्या कंपन्या ही पुरवू शकणार नाहीत. आगामी काळामध्ये संपूर्ण राज्यामध्ये आयुर आपले वेगळे नाव निश्चित पणाने कमवेल. यासोबतच आयुर हे उच्च प्रतीचे उत्पादन ग्रामीण भागातील सर्वसामान्य शेतकरी व होतकरू कुटुंबाकडून घेत असल्याने त्यांचा मालही चांगल्या दराने जात असल्याने त्यांनाही फायदा होत आहे व आगामी काळात अजून फायदा सर्वसामान्य शेतकरी व होतकरू कुटुंबाला होईल, असा विश्वासही माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी व्यक्त केला.


Back to top button
Don`t copy text!