वडजल येथे कृषिकन्यांकडून जि. प. शाळेतील नवागतांचे स्वागत

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. १९ जून २०२४ | फलटण |
फलटण तालुक्यातील वडजल येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांचे संलग्न व फलटण एज्युकेशन सोसायटी संचालित कृषी महाविद्यालय फलटण येथील कृषिकन्या, शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक वर्ग, गावचे सरपंच, ग्रामस्थ, प्रगतशील शेतकरी व तरुण कार्यकर्ते यांच्याद्वारे गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ढेंबरेमळा वडजल येथे शैक्षणिक नववर्षी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी कविता सादर केली व खाऊ वाटप करण्यात आले.

महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या अभ्यासक्रमाप्रमाणे ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम आणि कृषी औद्योगिक संलग्न उपक्रम २०२४-२५ साठी कृषी महाविद्यालय फलटण यांच्या या उपक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण सर, कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्नील लाळगे, कार्यक्रम समन्वयक निलिमा धालपे, कार्यक्रम अधिकारी प्रा. नितिशा पंडीत यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

कृषिकन्या ज्ञानेश्वरी जाधव, जगताप प्राजक्ता, धुमाळ सई, गिरमे ऐश्वर्या, खिलारे सुप्रिया, गावडे शुभांगी, गायकवाड श्रेया, जगताप धनश्री व सरपंच रेश्मा दत्तात्रय ढेंबरे, माजी सरपंच संगीता ढेंबरे, प्राध्यापक शिंदे व प्राध्यापक निकिता पवार मॅडम, ग्रामस्थ वामन ढेंबरे, सुवर्णा घनवट, पांडुरंग ढेंबरे, लालासो ढेंबरे यांच्या उपस्थितीत स्वागत करण्यात आले.


Back to top button
Don`t copy text!