सोनवडी खुर्द येथे दहावी-बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २२ जून २०२४ | फलटण |
सोनवडी खुर्द येथे ग्रामपंचायत व सोनेश्वर तरुण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने गावातील दहावी व बारावी उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून स्वप्निल सोनवलकर, श्रीमती शालनताई सूर्यवंशी सरपंच, शरद सोनवलकर उपसरपंच, निंबाळकर ग्रामसेवक, सचिन सूर्यवंशी पोलिस पाटील, संदीप सोनवलकर तंटामुक्ती अध्यक्ष, सचिन गोरख सूर्यवंशी सदस्य, भ्रष्टाचार वि. जनशक्ती संघटना उपाध्यक्ष, रामहरी सोनवलकर, संजय शिवाजी मोरे, अध्यक्ष भष्टाचार वि. जनशक्ती संघटना, दादा शिंदे प्रगतशील शेतकरी, अक्षय सोनवलकर, आबा पवार, भगवान पवार, जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी व शिक्षक वर्ग हे उपस्थित होते.

याप्रसंगी शरद सोनवलकर, दादा शिंदे, संदीप सोनवलकर, अक्षय सोनवलकर, निंबाळकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

सत्काराला उत्तर देताना स्वप्नील सोनवलकर म्हणाले की, माझा सत्कार १९९२ साली झाला होता. त्यातून मी प्रेरणा घेऊनच मी आज अधिकारी झालो. आजच्या या सत्कारातून तुम्हीही प्रेरणा घेऊन मोठे अधिकारी व्हावे, अशा शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विठ्ठल सोनवलकर, राजेंद्र आडके (ग्रामपंचायत कर्मचारी) यांनी परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार संदीप सोनवलकर यांनी मानले.


Back to top button
Don`t copy text!