विषय गंभीर असेल तर तुम्हीच खंबीर होणे काळाची गरज – अभिनेते रामभाऊ जगताप

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. २२ जून २०२४ | फलटण |
धकाधकीच्या युगात प्रत्येक व्यक्ती समस्याग्रस्त असून प्रतिकूल परिस्थिती हीच देणगी मानली पाहिजे. विषय गंभीर असेल तर तुम्हीच खंबीर होणं काळाची गरज असल्याचे चांडाळ चौकडीच्या करामती फेम, भुंडीस चित्रपट फेम अभिनेते रामभाऊ जगताप यांनी सांगितले.

दुधेबावी, ता. फलटण येथील ग्रामविकास प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित संत गाडगेबाबा व्याख्यानमालेत रामभाऊ जगताप बोलत होते. अध्यक्षस्थानी सामाजिक वनीकरण विभाग सातारचे विभागीय वनअधिकारी हरिश्चंद्र वाघमोडे होते.

रामभाऊ जगताप म्हणाले, संकटावर मात केल्यास निश्चितपणे यश मिळत असून विषय गंभीर असल्यास खंबीरपणे मार्ग काढावा. जिद्द चिकाटी आणि परिश्रम या त्रिसूत्रीवर प्रत्येक गंभीर विषयावर मार्ग निघू शकतो. आई-वडिलांचे संस्कारही जीवनात प्रेरणादायी ठरत असून जीवनात सातत्यपूर्ण संकटे येतच असतात, यावर उपाय म्हणून चांगल्या पुस्तकांचे वाचन केलं तरी संकटावर निश्चित मार्ग निघत असल्याचा आत्मविश्वास प्रसिद्ध अभिनेते रामभाऊ जगताप यांनी व्यक्त केला.

विभागीय वनअधिकारी हरिश्चंद्र वाघमोडे म्हणाले, दुधेबावी ग्रामविकास प्रतिष्ठानची व्याख्यानमाला सातत्यपूर्णपणे होत असून प्रबोधनाने लोकांमध्ये सकारात्मक बदल होत असतो. व्याख्यानमालेमुळे प्रशासनातही जाण्याचे प्रमाण निश्चित वाढेल, असा आत्मविश्वास वाघमोडे यांनी व्यक्त केला.

मान्यवरांचे स्वागत प्रतिष्ठानचे अध्यक्ष शशिकांत सोनवलकर यांनी केले. प्रास्ताविक व्याख्यानमाला कमिटीचे अध्यक्ष डॉ. सागर कराडे यांनी केले.

सूत्रसंचालन सांस्कृतिक कमिटीचे अध्यक्ष सचिन सोनवलकर, प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष संतोष भांड यांनी केले. उपस्थितांचे आभार प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष विजयकुमार नाळे यांनी मानले. सेवानिवृत्त मंत्रालय उपसचिव दिनकरराव सोनवलकर, रविंद्र कोलवडकर, अभिनेते निखिल साळुंखे, श्रेयस जगताप, प्रतिष्ठानचे खजिनदार डॉ. युवराज एकळ, सचिव विठ्ठल सोनवलकर, भानुदास सोनवलकर, पोपटराव सोनवलकर, भीमराव नाळे, कृषीमित्र संजय सोनवलकर, तात्याबा सोनवलकर, सामाजिक कार्यकर्तेदत्तात्रय दडस, बाजीराव सोनवलकर, फलटण तालुका ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष सुभाषराव सोनवलकर, सोसायटीचे संचालक राजेंद्र नाचण, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र चांगण आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!