
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. १३ जुलै २०२४ | फलटण |
साखरवाडी (ता. फलटण) गावच्या हद्दीत सांगवी पुलाजवळ दत्त मंदिराशेजारी राजेंद्र ज्ञानदेव पवार (वय ४९, रा. साखरवाडी) हा १२ जुलै २०२४ रोजी सायं. ४.३० वाजता बेकायदा मटका जुगार चालविताना आढळला. फलटण ग्रामीण पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला असून त्याच्याजवळून जुगारातील रोख रक्कम ३२०५० रुपये व कल्याण मटका नावाचे जुगाराचे साहित्य जप्त केले आहे.
अधिक तपास स. पो. फौ. हजारे करत आहेत.
