मठाचीवाडी येथे कृषीकन्यांनी महिलांना दिले दुधापासून पनीर बनवण्याचे प्रशिक्षण

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य | दि. ९ ऑक्टोबर २०२३ | फलटण |
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संचलित, कृषी महाविद्यालय फलटणच्या चतुर्थ वर्षातील कृषीकन्यांनी मठाचीवाडी गावातील महिलांना दुधापासून पनीर बनवण्याचे प्रशिक्षण नुकतेच दिले.

ग्रामीण जागरूकता कृषी कार्यानुभव औद्योगिक जोड प्रकल्प २०२३-२४ अंतर्गत सुमारे दहा आठवडे कृषीकन्या मठाचीवाडी गावात वास्तव्यास राहणार आहेत. या कार्यक्रमांतर्गत शनिवार, दि.१२ ऑगस्ट रोजी मठाचीवाडी, ता. फलटण येथील महिलांसाठी दुधापासून पनीर बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. घरगुती पद्धतीने दुधापासून पनीर कसे बनवण्यात येते आणि व्यावसायिक दृष्टिकोनातून त्याचे उत्पादन कसे घ्यायचे, यावर कृषीकन्यांनी थोडक्यात माहिती दिली.

या कार्यक्रमास सरपंच सौ. जयश्रीताई भोसले समवेत गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. हे प्रात्यक्षिक श्री. विकास चंद्रकांत जाधव यांच्या घरी सादर करण्यात आले.

कृषी महाविद्यालय फलटणच्या कृषीकन्या समृद्धी मोहिते, साक्षी शिंदे, हर्षदा लोखंडे, प्राजक्ता ननावरे, पूजा मारवाडी, शिवांजली धुमाळ, समृद्धी कुंजीर, समृद्धी उल्हारे या विद्यार्थिनींना कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण, कार्यक्रम समन्वयक प्रा. निलीमा धालपे, कार्यक्रमाधिकारी प्रा. स्वप्निल लाळगे, प्रा. नितिशा पंडित व प्रा. रश्मी नायकवडी मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!