दैनिक स्थैर्य | दि. १७ फेब्रुवारी २०२४ | फलटण |
फलटण तालुक्यातील धुळदेव येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न फलटण एज्युकेशन सोसायटी अंतर्गत कृषी महाविद्यालय फलटणच्या कृषिकन्यांनी ग्रामीण जागरूकता कृषी कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प २०२३-२०२४ कार्यक्रमाअंतर्गत बोर्डो मिश्रण बनवण्याचे प्रात्यक्षिक दिले.
कृषीकन्या सिद्धी शेटे, साक्षी जाधव, समृद्धी जगताप, सिद्धिका कांबळे, स्वेजल पाटील, प्रियांका शिंदे, प्रियांका भोसले व श्वेता सस्ते यांनी बोर्डो मिश्रण तयार करण्याचे प्रात्यक्षिक गावकर्यांसमोर सादर केले. याअंतर्गत त्यांनी बोर्डो मिश्रण तयार करण्याचे साहित्य जसे की, मोरचुद (कॉपर सल्फेट), चुना (लाइम) इत्यादी रसायनाची माहिती शेतकर्यांना दिली. तसेच हे मिश्रण तयार करण्याची शास्त्रीय पद्धत शेतकर्यांसमोर सादर केली. तसेच त्यांनी हे मिश्रण फवारण्याचे फायदे जसे की, वेलवर्गीय फळझाडांवरील बुरशीजन्य रोग, द्राक्षावरील भुरी, द्राक्षावरील केवडा रोग इ. नियंत्रित करण्यास मदत करते. हे मिश्रण वेलवर्गीय फळझाडांबरोबर इतर फळझाडे, सजावटीची झाडे यांवरील बुरशीजन्य रोग नियंत्रित करते, हे सांगितले.
कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण सर, उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर सर, कार्यक्रम समन्वय प्रा. नीलीमा धालपे, कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्नील लाळगे सर, प्रा. नितिशा पंडित, प्रा. भोसले सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला.
शेतकर्यांनी या प्रात्यक्षिकास मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्तम प्रतिसाद दिला.