कोळकी येथे हळदी-कुंकूवाच्या कार्यक्रमास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद


दैनिक स्थैर्य | दि. १७ फेब्रुवारी २०२४ | फलटण |
माजी जिल्हा परिषद सदस्या श्रीमंत शिवाजंलीराजे नाईक निंबाळकर व कोळकी ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. अपर्णा विक्रम परवाले यांच्या प्रमुख उपस्थितीत कोळकी येथे हळदी-कुंकूवाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमास कोळकी गावातील बहुसंख्य महिला वर्ग उपस्थित होता. या कार्यक्रमा श्रीमंत शिवाजंलीराजे नाईक निंबाळकर यांनी सर्व महिलांना मार्गदर्शन केले व मोठ्या संख्येने या कार्यक्रमास महिला उपस्थित राहिल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

या कार्यक्रमास महिलांसह माजी सरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!