अशोक कांबळे समाज भूषण पुरस्काराने सन्मानीत

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । 8 जून 2025। फलटण । महाराष्ट्र शासनाच्या वतीने सामाजिक कार्याबद्दल दिला जाणारा यावर्षीचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार फलटण येथील अशोक कांबळे यांना नुकताच जाहीर करण्यात आला आहे.

अशोक कांबळे यांनी गेली तीस ते पस्तीस वर्ष सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय काम केले आहे. या कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

कांबळे यांनी राष्ट्रीय चर्मकार संघाचे जिल्हाध्यक्ष म्हणून सात वर्ष काम केले आहे. सध्या ते राज्य कार्यकारिणी सदस्य म्हणून कार्यरत आहेत. तसेच त्यांनी बँक ऑफ इंडिया येथेही चांगली सेवा करून निवृत्त झाले आहेत.

त्यांच्या पुरस्कार मिळाले बद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!