बौद्धजन पंचायत समितीच्या वतीने जागतिक महिला दिनाचे आयोजन


दैनिक स्थैर्य । दि. ०३ मार्च २०२२ । मुंबई । बौद्धजन पंचायत समिती संलग्न महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सरसेनानी मा. आनंदराज आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मध्यवर्ती महिला मंडळ अध्यक्षा सुशिलाताई जाधव यांच्या अध्यक्षतेखाली जागतिक महिला दिनाचे आयोजन दि. ८ मार्च २०२३ रोजी सायंकाळी ५:०० वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह, भोईवाडा, परेल येथे करण्यात आले आहे.

सदर कार्यक्रमास जेष्ठ साहित्यिका मा. उर्मिलाताई पवार व साहित्यिका मा. नंदा कांबळे-मोरे या प्रमुख वक्ता म्हणून उपस्थित राहणार असून उपसभापती विनोदजी मोरे, कार्याध्यक्ष लक्ष्मणजी भगत, माजी कार्याध्यक्ष किशोरजी मोरे, उपकार्याध्यक्ष अशोकजी कांबळे, एच. आर. पवार, मनोहर मोरे, चंद्रमणी तांबे, अंकुश सकपाळ यांची प्रमुख उपस्थिती राहील तसेच मध्यवर्ती महिला मंडळाचे सरचिटणीस अंजलीताई मोहिते सूत्रसंचालन करणार आहेत.

तरी सर्व व्यवस्थापक मंडळ, शाखा पदाधिकारी, सदस्य, सभासद, बौद्धाचार्य, महिला मंडळ यांनी सदर कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी विनंती जनसंपर्क व प्रसिद्धी समिती अध्यक्ष रमेश जाधव व चिटणीस विश्वास मोहिते यांनी समितीच्या वतीने काढलेल्या परिपत्रकात केली आहे.


Back to top button
Don`t copy text!