स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सत्तेत येताच राष्ट्रवादीला निधीचं घबाड; आश्चर्य म्हणजे दात्यांमध्ये भाजपचा बडा नेता!

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
February 23, 2021
in मुंबई - पुणे - ठाणे
ADVERTISEMENT

स्थैर्य, मुंबई, दि २३: राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसची चांगलीच चांदी झाली आहे. राज्यात सत्तेतील महत्त्वाची खाती राष्ट्रवादीला मिळाली आहेच पण राष्ट्रवादीच्या गंगाजळीत पाच पटीने वाढ झाली आहे. एवढेच नव्हे तर राष्ट्रवादीला भाजपचे मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांच्याकडूनही कोट्यवधीची आर्थिक रसद मिळाली आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये राष्ट्रवादीला 59.94 कोटीचा निधी मिळाला होता. गेल्या वर्षी हा निधी 12.05 कोटी रुपये होता. राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे पक्षाच्या योगदानाचा अहवाल सादर केला आहे. या अहवालानुसार भाजपचे मुंबईचे अध्यक्ष आणि आमदार मंगलप्रभात लोढा यांच्या लोढा डेव्हल्पर्सने राष्ट्रवादीला 5 कोटींची निधी दिल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. ‘द प्रिंट’ने या बाबतचे वृत्त दिलं आहे. प्रत्येक वर्षी राजकीय पक्षांना त्यांच्या 20,000 रुपयांच्या योगदानाची माहिती निवडणूक आयोगाला द्यावी लागते. त्यातून ही माहिती उजेडात आली आहे.

संशय निर्माण करण्याची गरज नाही

लोढा हे भाजपचे पाच वेळा निवडून आलेले आमदार आहेत. सध्या भाजपचे मुंबई अध्यक्ष आहेत. मी कंपनीचे थेट व्यवहार पाहत नाही. तुम्हाला कंपनीच्याच व्यक्तीच्या संपर्कात राहून माहिती घ्यावी लागेल, असं सांगत लोढा यांनी यावर बोलण्यास नकार दिला. राष्ट्रवादीला जो निधी मिळतो तो आम्ही घेतो. हा निधी आम्ही पारदर्शकपणे निवडणूक आयोगाला सादर केला आहे. त्याभोवती संशय निर्माण करण्याची गरज नाही, असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितलं.

सत्तेबाहेर असताना राष्ट्रवादीला मदत नाही

यापूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी होती. हे दोन्ही पक्ष राज्यात ऑक्टोबर 1999 ते ऑक्टोबर 2014 पर्यंत सत्तेत होते. त्यानंतर भाजपचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. शिवसेनेच्या मदतीने फडणवीस सत्तेत आले. 2019 मध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर राज्यात सत्तांतर झालं. राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेच्या बाहेर असताना लोढा डेव्हल्पर्सने राष्ट्रवादीला कधीच देणगी दिली नाही. वास्तविक राष्ट्रवादीला 2014-15मध्ये देणगी मिळाली होती. त्या वर्षी राष्ट्रवादीला 38,82 कोटी रुपयांची देणगी मिळाली होती.

या शिवाय लोढा ग्रुपची मालकी असलेल्या पलावा ड्वेलर्सनेही 2014-15मध्ये राष्ट्रवादीला 3 कोटींची देणगी दिली होती. विशेष म्हणजे त्यानंतर लोढा ग्रुप आणि त्यांच्या मालकीच्या इतर कंपन्यांनी राष्ट्रवादीला आर्थिक रसद पुरवली नाही. त्यामुळे राष्ट्रवादीची गंगाजळीतही फार रक्कम आली नाही.

महापालिका निवडणुकीवेळी मदत

2015-16 मध्ये निवडणूक आयोगाला 20 हजाराच्या देणगीवर राष्ट्रवादीने 71.38 लाख रुपये जाहीर केले होते. 2016-17मध्ये मुंबई, पुण्यासह दहा मुख्य महापालिकांच्या निवडणुका होत्या. त्यावेळी राष्ट्रवादीला 6.34 कोटी रुपये मिळाले होते. 2017-18 आणि 2018-19 मध्ये राष्ट्रवादीला क्रमश: 2.08 कोटी आणि 12.05 कोटी रुपये मिळाले.

या कंपन्यांकडूनही आर्थिक रसद

लोढा ग्रुप शिवाय इतर अनेक डेव्हल्पर्सने राष्ट्रवादीला 2019-20मध्ये मोठी देणगी दिली आहे. मागरपट्टा सिटी डेव्हल्पमेंट, कुमार प्रॉपर्टीज, पंचशील कार्पोरेट पार्क, कप्पा रिल्टर्स, बी. जी. शिर्के कन्स्ट्रक्शन, मॉडर्न रोड मेकर्स आणि पेगासस प्रॉपर्टीज आदींनी राष्ट्रवादीला भरभरून देणगी दिली आहे.

सीरमकडून 3 कोटी

त्याशिवाय अनेक उद्योजकांनी राष्ट्रवादीला मोठ्या प्रमाणावर देणगी दिली आहे. सीरम इन्स्टिट्यूटच्या आदर पुनावाला यांनी 3 कोटींची देणगी दिली आहे. त्याशिवाय फिनोलेक्स इंड्रस्ट्रीज, एमक्युअर फार्मासिटिक्लस, धारीवाल इंडस्ट्री आणि डेम्पो इंडिया प्रायव्हेट लिमिटेडनेही मोठी देणगी दिली आहे.

लोढांचे पाच कोटी धर्मांध की धर्मनिरपेक्ष?

बातमी महत्वाची आहे. अर्थात मुख्य प्रवाहातल्या माध्यमांमध्ये ती दिसली नाही. ‘द प्रिंट’ या पर्यायी माध्यमांनं ती दिली आहे. भाजपाचे मुंबई प्रदेशाध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनी राष्ट्रवादीला याच आर्थिक वर्षात तब्बल पाच कोटींची देणगी दिली आहे. उठसूठ सगळ्यांना संघी ठरवणाऱ्या राष्ट्रवादी पत्रकारांनी हे नेमकं काय आहे ते लोकांना सांगितलं पाहिजे. लोढांचे पाच कोटी धर्मांध की धर्मनिरपेक्ष ते लोकांना कळलं पाहिजे.
देणाराने देत जावे. आपली काहीच हरकत नाही. फक्त दोन्ही पक्षाच्या समर्थकांनी निदान इतरांना नैतिकता, सेक्युलॅरिझम वगैरे शिकवू नये इतकंच, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय विश्लेषक डॉ. विश्वंभर चौधरी यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमधून व्यक्त केली आहे.

शरद पवारच राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक

2019च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ चार जागांवर विजय मिळाला. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी 78 रॅली काढून आक्रमक प्रचार केला होता. तरीही त्यांना 2014मध्ये मिळालेल्या यशाएवढंच यश मिळालं होतं. त्यानंतर पवारांनी 2019च्या विधानसभा निवडणुकीची धुरा स्वत:च्या खांद्यावर घेतली आणि 54 जागा निवडून आणल्या. 2014 पेक्षा राष्ट्रवादीला यंदा 13 जागा जास्त मिळाल्या आहेत.


ADVERTISEMENT
Previous Post

पुणेरी माणसाच्या हिंमतीला नाही तोड, चाकू लागल्यानंतरही रक्ताने लिहून ठेवला पुरावा

Next Post

मोबाईलवरुन झालेल्या बाचाबाची नंतर चाकूने भोसकून खून

Next Post

मोबाईलवरुन झालेल्या बाचाबाची नंतर चाकूने भोसकून खून

ताज्या बातम्या

राष्ट्रवादीचे नेते दीपक पवार यांच्या कारला अपघात, टायर फुटल्याने महामार्गावर दोन कारची धडक

March 3, 2021

‘अमोल भावा तू नवीन आहेस, माझे आणि माझ्या बापाचे काय संबंध आहेत, हे त्यांनाच विचार’- चित्रा वाघ

March 3, 2021

वहिवाटीच्या कारणावरून दोन गटात हाणामारी, शाहूनगरमधील अमराई रेसीडेन्सी येथील घटना

March 3, 2021

सुरूर येथे एकावर जीवघेणा हल्ला

March 3, 2021

धूम स्टाईलने मंगळसुत्र हिसकावून दोघांचा पोबारा 

March 3, 2021

वसुलीसाठी गेलेल्या नगरपंचायत कर्मचार्‍यांना कोंडून धक्काबुक्की लोणंद येथील धक्कादायक प्रकार

March 3, 2021

फलटणला कापूस खरेदी केंद्र सुरु करावे: आमदार दीपक चव्हाण यांची विधानसभेत मागणी

March 3, 2021

पेट्रोल दरवाढीमुळे फलटण तालुक्यात चक्क पेट्रोल लाईनमधुन पेट्रोल चोरीचा प्रयत्न

March 2, 2021

राष्ट्रीय सुरक्षा दिन

March 2, 2021

व्हायचं होतं डॉन, पण एन्काऊंटरच्या भीतीने पोलिसांपुढे लोटांगण, अट्टल गुन्हेगाराला फिल्मी स्टाईलने बेड्या

March 2, 2021
Load More

आमच्याबद्दल

हे दैनिक मालक, मुद्रक, प्रकाशक प्रसन्न दिलीप रुद्रभटे यांनी प्रसन्न ग्राफिक्स, मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा. फलटण- 415523 (महाराष्ट्र) येथे छापून मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा . फलटण-415523 (महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले. संस्थापक: स्व. दिलीप रुद्रभटे, संस्थापक संपादक : श्रीमती उमा रुद्रभटे. संपादक: प्रसन्न दिलीप रुद्रभटे या अंकात प्रसिध्द झालेल्या मतांशी संपादक सहमत असतीलच असे नाही. वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.

आमचा पत्ता

मुख्य कार्यालय – गणेश – प्रसाद, प्लॉट नंबर १३, मालोजीनगर, कोळकी, ता. फलटण, जिल्हा सातारा

सातारा विभागीय कार्यालय – कला वाणिज्य महाविद्यालय, कोटेश्वर मैदानासमोर, राधिका रोड, सातारा 415002

संपर्क : 7385250270

E-mail ID : [email protected]

  • Home

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.