
दैनिक स्थैर्य । 18 जून 2025 । फलटण । येथील कृषि उत्पन्न बाजार समितीत विविध धान्यांची आवक झाली. त्यांचे घाऊक बाजारभाव पुढीलप्रमाणे आहेत.
बाजार समितीत 151 क्विंटल ज्वारीची आवक झाली. त्यास किमान 1 हजार 700 रुपये तर कमाल 3 हजार 500 दर मिळाला. बाजरीची 295 क्विंटल आवक झाली. त्यास किमान 1 हजार 700 रुपयांपासून ते कमाल 3 हजार 200 रुपये क्विंटल दर मिळाला.
गव्हाची 613 क्विंटल आवक झाली. गव्हास किमान 2 हजार 250 रुपये तर कमाल 2 हजार 800 रुपये दर मिळाला. 104 क्विंटल हरभर्याची आवक झाली. त्यास किमान 4 हजार 500 रुपये क्विंटल ते 6 हजार रुपये क्विंटलपर्यंत दर मिळाला. मक्याची 224 क्विंटल आवक झाली. त्यास किमान 1 हजार 800 रुपयेत तर कमाल 2 हजार 211 रुपये क्विंटल दर मिळाला. खपलीची 13 क्विंटल आवक झाली. खपलीस 4 हजार 500 रुपये तर कमाल 4 हजार 850 दर मिळाला. घेवड्याची 138 क्विंटल आवक झाली. घेवड्यास किमान 4 हजार 200 रुपये तर कमाल 7 हजार 500 रुपये क्विंटल दर मिळाला. मुगाची 6 क्विंटल आवक झाली. मुगाला किमान 4 हजार 500 किंटल तर कमाल 7 हजार 200 रुपये क्विंटल दर मिळाला. चवळीची 2 क्विंटल आवक झाली . चवळीस कमाल 11 हजार 600 रुपये क्विंटल दर मिळाला. तुरीची 1 क्विंटल आवक झाली. तुरीस 6 हजार 100 रुपये दर मिळाला.