यशवंतराव हायस्कूलचे विद्यार्थ्यांचे विविध परीक्षेत उल्लेखनीय यश


दैनिक स्थैर्य । 18 जून 2025 । फलटण । येथील श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनियर कॉलेज मधील विद्यार्थ्यांनी इयत्ता-10 वी व इयत्ता 12 वी बोर्ड परीक्षेमध्ये तालुक्यात सर्वात जास्त गुण मिळवून यश मिळविले.

पार्थ नितीन जाधव याने 12 वी शास्त्र शाखेत 86.68 टक्के गुण तसेच प्रगती गजानन निंबाळकर हिने इयत्ता 10 वी परीक्षेत 97.60% गुण मिळवून फलटण तालुक्यात प्रथम आले आहेत. पार्थ नितीन जाधव याने नीट परीक्षेत 582 गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला. तसेच एमएचटी-सीईटी, नीट मार्गदर्शन वर्गामध्ये वेदांत नरेश सोनगिरे याने 99.45 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला आहे तर आदित्य अजित नांदले याने एमएचटी-सीईटी परीक्षेत 96.52 टक्के गुण मिळवून दुसरा क्रमांक मिळविला. कॉमर्स विभागातील सिद्धेश संतोष लाळगे यानेे अकाउंटन्सी विषयात 100 पैकी 100 गुण मिळवून उज्जल यश मिळविले.

या यशाबद्दल यशस्वी विद्यार्थ्यांचे श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा श्रीमती सविता सुभाषराव सूर्यवंशी (बेडके), संस्थेचे मानद सचिव डॉ.सचिन सुभाषराव सूर्यवंशी बेडके, नियामक मंडळाचे सदस्य महेंद्र सुभाषराव सूर्यवंशी (बेडके) तसेच प्रभारी प्राचार्य पी. डी. घनवट, विभाग प्रमुख, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी अभिनंदन केले.


Back to top button
Don`t copy text!