बारावी बोर्डाची कॉमर्स व किमान कौशल्य शाखेच्या विद्यार्थ्यांची मुधोजी महाविद्यालयात बैठक व्यवस्था


दैनिक स्थैर्य | दि. २० फेब्रुवारी २०२४ | फलटण |
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, कोल्हापूर विभागामार्फत आयोजित केलेल्या एच.एस.सी. बोर्ड परीक्षा फेब्रुवारी / मार्च २०२४ ची कॉमर्स व किमान कौशल्य शाखेच्या विद्यार्थ्यांची परीक्षा बुधवार, दि. २१ फेब्रुवारी २०२४ पासून सुरू होत आहे.

मुधोजी महाविद्यालय व ज्युनिअर कॉलेज फलटण केंद्र क्रमांक ०१०४ मध्ये कॉमर्स शाखेच्या एक्स ०९७८१२ ते एक्स ०९८२९१ व किमान कौशल्य शाखेच्या एक्स ११४९६६ ते एक्स ११५१५३ हे बैठक क्रमांक असणार्‍या विद्यार्थ्यांचे एच.एस.सी. बोर्डाच्या वेळापत्रकाप्रमाणे सर्व विषयांचे पेपर होतील.

विद्यार्थ्यांनी केंद्रावर बोर्डाने प्रकाशित केलेल्या अधिकृत वेळापत्रकाप्रमाणे प्रवेशपत्र (रिसीट), ओळखपत्र व लेखन साहित्य घेऊन शालेय गणवेशात वेळेपूर्वी अर्धा तास अगोदर उपस्थित रहावे.

विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्राच्या आवारात भ्रमणध्वनी (मोबाईल), टॅबलेट, इलेक्ट्रॉनिक घड्याळ वा तत्सम बोर्डाने बंदी घातलेली साधने किंवा उपकरणे परीक्षा केंद्रावर बाळगण्यास सक्त मनाई आहे.

विद्यार्थ्यांनी कोणत्याही गैरमार्गाचा अवलंब न करता कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरणात निर्भयपणे परीक्षा द्यावी, तसेच परीक्षा व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी विद्यार्थी व पालकांनी सहकार्य करावे, असे आवाहन केंद्र संचालक श्री. वेदपाठक संजय यांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!