सोनगाव येथे कृषीकन्यांकडून मृदा आरोग्य कार्ड योजनेविषयी शेतकर्‍यांना माहिती


दैनिक स्थैर्य | दि. २० जानेवारी २०२४ | फलटण|

फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित, कृषी महाविद्यालय फलटणच्या कृषीकन्यांनी कृषी जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत मृदा आरोग्य कार्ड योजना याविषयी कार्यक्रम आयोजित केला.

या कार्यक्रमाअंतर्गत सोनगाव, ता. फलटण येथील शेतकर्‍यांना कृषी महाविद्यालय फलटणच्या माती व पाणी परीक्षण तज्ज्ञ डॉ. प्राजक्ता मेटकरी-खरात मॅडम यांनी मार्गदर्शन केले व मृदा आरोग्य कार्ड योजनेचे महत्त्व पटवून दिले. यावेळी कार्यक्रमास गावातील प्रतिष्ठित ग्रामस्थ व शेतकरी उपस्थित होते.

कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण सर व श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर सर, कार्यक्रम अधिकारी स्वप्रील लाळगे सर, कार्यक्रम समन्वयक प्रा. निलीमा धालपे मॅडम, कार्यक्रम अधिकारी प्रा. नितीषा पंडीत मॅडम व प्रा. गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषीकन्या हर्षल भालघरे, प्रीतल भोसले, प्रेरणा खोपडे, वैष्णवी पिसाळ, भाग्यश्री राऊत, नेहा साळुंखे, नंदिनी शिंदे या कृषीकन्यांनी कार्यक्रम पार पाडला.


Back to top button
Don`t copy text!