दैनिक स्थैर्य । दि.२६ जानेवारी २०२२ । सातारा । साताऱ्यात नगरभूमापन कार्यालयामध्ये अनागोंदी कारभार माजला आहे दस्त झालेल्या नोंदी सुद्धा जाणीपूर्वक टाळल्या जात असल्याच्या तक्रारी लोकांच्या वाढले असून प्रशासनाकडे याविषयाची तक्रार करणार असल्याचा इशारा सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे या सर्व नोंदी आर्थिक तडजोडीच्या कारणासाठी टाळल्या जात असल्याच्या सुरस कहाण्या समोर येत आहेत.
भुमी अभिलेख अधिनियम प्रमाणे विहित कालावधीत अगदी 30 दिवसाच्या आत प्रक्रिया पूर्ण झालेल्या प्रस्तावांच्या नोंदी नगर भूमापन अधिकाऱ्याकडू प्रमाणित करणे आवश्यक असते मात्र आर्थिक चळवळीच्या निमित्ताने ही प्रकरणे निकाली काढून नव्याने दाखल होणाऱ्या प्रकरणांचा कार्यालयात लागला आहे काही सामाजिक कार्यकर्त्यांनी कार्यालयास भेट दिल्यानंतर हा प्रकार लक्षात आला माहुली येथील एका वयोवृद्ध माणसाला केवळ वारस नोंद घालण्यासाठी तब्बल सहा महिने हेलपाटे मारावे लागत आहेत या प्रकरणावर कोणीही बोलायला तयार नाही करोनाच्या भितीमुळे कार्यालयात कोणी यायला तयार नाही अशा वेळी नगरभूमापन अधिकारी कोणाशी नोंद प्रलंबित असल्यास व एखाद्या प्रस्तावावर कोणाचा आक्षेप असल्यास त्यालाच घेऊन घ्या असे दटावत आत एका प्रकरणांमध्ये नगर भूमापन अधिकाऱ्यांना नुकतीच घसघशीत बिदागी मिळाली जी प्रकरणे बिदागी मधली असतात त्यांना तातडीने हिरवा कंदील दिला जातो मात्र ज्या प्रकरणांच्या तांत्रिक अडचणी असतात ती प्रकरणे सुद्धा सुनावणी घेऊन 45 दिवसांच्या आत निकाली काढणे आवश्यक असते मात्र तसे न होता ही प्रकरणे तशीच पडून राहिल्याने नगर भूमापन कार्यालयात फायलींचा ढीग वाढला आहे.
याविषयाची तक्रार भुमी अधिक्षक कार्यालयाकडे होऊनही तेसुद्धा हातावर हात धरून शांत बसले आहेत सामान्य माणूस नगर भूमापन कार्यालयात हेलपाटे मारून वैतागला आहे मिळालेल्या माहितीनुसार तब्बल 56 प्रकरणे अद्यापही प्रलंबित असल्याने अर्ज धारकांना फुकटचा मनस्ताप सोसावा लागत आहे विशेष म्हणजे या परिस्थितीचा फायदा उकळणारे ही सोकावले आहेत असेच काही पोपटपंची करणारे चमको बहाद्दर कार्यालयात पोहोचले आणि नगर भूमापन अधिकाऱ्या ला दटावणी करू लागले नगर भूमापन कार्यालयात सुरु असलेल्या बेबंद कारभाराविषयी महसूल विभागाकडे याचा सविस्तर अहवाल जाणे अपेक्षित आहे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घालून कठोर कारवाई करावी अशी मागणी सातारकर करीत आहेत.