IAS अधिकारी मनोज सौनिक यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती, सरकारने काढले आदेश

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. २८ एप्रिल २०२३ । मुंबई । राज्याच्या मुख्य सचिवपदी मनोज सौनिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मनोज सौनिक हे १९८७ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहे. राज्याचे विद्यमान मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव ३० एप्रिल रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या जागी सौनिक यांची नियुक्ती करण्यात आलीये.

महाराष्ट्राचे विद्यमान मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांचा कार्यकाळ येत्या ३० एप्रिल रोजी पूर्ण होणार आहे. यानंतर रिक्त होणाऱ्या महाराष्ट्राच्या मुख्य सचिवपदी मनोज सौनिक यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलंय. मनौज सौनिक यांच्याकडे सध्या अपर मुख्य सचिव (वित्त) पदाचा कार्यभार आहे. तसं त्यांच्याकडे असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव पदाचा अतिरिक्त कार्यभार पुढील आदेश येईपर्यंत सौनिक यांच्याकडे राहणार आहे.


Back to top button
Don`t copy text!