
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । दि. २० मे २०२२ । सातारा । जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सातारा यांच्या अधिपत्याखालील सैनिकी मुलांचे वसतिगृह, सातारा, सैनिकी मुलींचे वसतिगृह, सातारा व सैनिकी मुलांचे वसतिगृह, कराड येथे 2022-23 या शैक्षणिक वर्षाकरीता प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे. दि.23 मे 2022 पासून प्रवेश पुस्तिकांची विक्री सुरु करण्यात येणार आहे. प्रथम फेरिकरिता प्रवेश अर्ज स्विकारण्याचा अंतिम दिनांक 30 जून 2022 आहे. तरी सर्व युद्ध विधवा, इतर माजी सैनिक विधवा, माजी सैनिक यांच्या पाल्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
