पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने अपर्णा जैन यांचा सन्मान

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक स्थैर्य । 13 मे 2025। फलटण । येथील पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती महोत्सव समिती व सुजन फाउंडेशन यांच्यावतीने संगिनी फोरममार्फत सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सौ. अपर्णा श्रीपाल जैन यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

हा कार्यक्रम संत उपळेकर महाराज मंदिर हॉल येथे आयोजित करण्यात आला होता. सौ.अलकाताई बेडकीहाळ यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जेष्ठ पत्रकार रवींद्र बेडकीहाळ होते. यावेळी महात्मा फुले विचार अभियान महाराष्ट्रचे अध्यक्ष संपतराव जाधव, साहित्यिक सर्जाकार सुरेश शिंदे सुजन फाउंडेशनचे अध्यक्ष अजितराव जाधव उपस्थित होते.

सौ. अपर्णा जैन यांच्या सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व धार्मिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार 2025 देऊन गौरव केला. सौ.अपर्णा जैन यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Back to top button
Don`t copy text!