
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा

स्थैर्य, सिंधुदुर्ग, दि.१, : तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात घेण्यात आलेला आणखी एक निर्णय उद्धव ठाकरे सरकारनं केराच्या टोपलीत टाकला आहे.
घर बांधणी परवानगीचे अधिकारही पुन्हा ग्रामपंचायतीकडे देण्यात आल्याची घोषणा शिवसेना नेते आणि महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सिंधुदुर्गात केली आहे.
दरम्यान, तत्कालीन फडणवीस सरकारने घर बांधणीच्या परवानगीचे अधिकार ग्रामपंचायतीकडून काढून घेतले होत. टाऊन प्लानिंगकडे (जिल्हा स्तरावर) हे अधिकार देण्यात आले होते. मात्र, या निर्णयामुळे ग्रामीण भागात बांधकाम परवानगीसाठी नागरिकांना मोठ्या अडचणी येत होत्या. त्याचप्रमाणे लोकप्रतिनिधींचाही या निर्णयाला कडाडून विरोध होता.
