चि.अनिरुद्ध बोबडे याची नवोदय विद्यालयात निवड


दैनिक स्थैर्य । दि.०४ जानेवारी २०२२ । फलटण । येथील फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमंत निर्मलादेवी प्राथमिक विद्यामंदीरचा विद्यार्थी चि.अनिरुद्ध कृष्णात बोबडे याची सातारा येथील जवाहर नवोदय विद्यालयात पुढील शिक्षणासाठी निवड झाली आहे.
सदर निवडीसाठी केंद्रीय नवोदय विद्यालय पात्र परिक्षेत उज्वल यश संपादन करताना चि.अनिरुद्ध यास श्रीमंत निर्मलादेवी प्राथमिक विद्यामंदीरच्या मुख्याध्यापिका सौ.वैशाली जाधव, शिक्षकवृंद यांच्यासह श्री क्लासेसचे संचालक श्रीकांत साळुंखे, सौ.प्रियांका साळुंखे यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल त्याचे अभिनंदन होत आहे.


Back to top button
Don`t copy text!