एंजल वनचे सुपरइजहियर कॅम्पेन

एंजल वनच्या स्मार्ट इन्व्हेस्टिंग सुपर अॅपचे उद्घाटन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. ३० जुलै २०२३ | मुंबई | एंजल वन लिमिटेड (पूर्वीची अँजल ब्रोकिंग लिमिटेड) भारतातील सर्वाधिक विश्वासार्ह फिनटेक कंपनी असून तिने #सुपरइजहियर कॅम्पेन सुरू केले आहे. हे एक एआय-पॉवर्ड कॅम्पेन असून त्यातून भारतातील अब्जावधी लोकांना एंजल वन सुपर अॅपसोबत आपल्या मालमत्ता निर्मितीच्या प्रवासात डेटा आणि तंत्रज्ञानाच्या शक्तीचा वापर करण्यासाठी सक्षम केले जात आहे. त्यातून सुपर अॅपच्या वेग, सुरक्षा आणि विश्वासार्ह अनुभवासारख्या खास आणि अविस्मणीय वैशिष्ट्यांवरही भर देण्यात आली आहे.

ख्यातनाम स्वीडिश संचालक अँडर्स फोर्समन यांच्या कल्पनेतून साकारलेल्या # सुपरइजहियर मोहिमेतून गुंतवणूकदार, व्यापाऱ्यांना माहिती दिली जाते आणि सुपर अॅप प्लॅटफॉर्म आता विविध प्रकारच्या गुंतवणूक प्रवासासाठी उपलब्ध आहे हे दर्शवते. हे सुपर अॅप ग्राहक केंद्रीभूतता विचारात ठेवून बनवले गेले आहे आणि त्याच कारणामुळे या ब्रँडवर १.५ कोटी भारतीयांनी विश्वास ठेवला आहे. इन्फ्लुएन्सर भागीदारी, सोशल मीडिया पोस्ट्स, बिझनेस चॅनल्स, वृत्तवाहिन्या, गुगल, मेटा जाहिराती, ओटीटी इत्यादींद्वारे हे तंत्रज्ञानाने शक्तिशाली कॅम्पेन जेनझेड आणि मिलेनियल्स आपल्या कस्टमाइज्ड आणि सुलभ गुंतवणूकीच्या अनुभवासाठी सुपर अॅपचा कशा प्रकारे वापर करू शकतात हे दाखवले गेले आहे. टायर २, टायर ३ आणि त्यापलीकडील शहरांमध्ये सुपर अॅप अनुभव आणण्यासाठी कंपनीने मोठ्या स्तरावर अॅक्टिव्हेशन उपक्रमदेखील सुरू केले आहेत.

एंजल वन लिमिटेडचे चीफ ग्रोथ ऑफिसर श्री. प्रभाकर तिवारी म्हणाले की,“आमचे ध्येय प्रत्येक भारतीय गुंतवणूकदाराचे एंजल वन सुपर अॅपद्वारे सक्षमीकरण करणे, सर्व स्तरांवर गुंतवणूक आणि व्यापारासाठी एक उत्तम आणि तांत्रिकदृष्ट्या अद्यायवत अनुभव देणे हे आहे. आम्ही ग्राहकांच्या गरजा समजून घेण्यासाठी व्यापक डेटाचा वापर करतो त्यामुळे अॅपमध्ये आम्हाला अत्यंत सुयोग्य प्रकारे गुंतवणूकीसाठी प्लॅन तयार करून देता येतात. #सुपरइजहियर कॅम्पेनच्या माध्यमातून आम्ही एंजल वन सुपर अॅपचे लाभ दाखवतो आणि जास्तीत-जास्त ग्राहकांना आकर्षित करून कमी व्याप्ती असलेल्या बाजारांमध्ये जाण्यासाठी प्रयत्नशील आहोत, जेणेकडून आर्थिक विकास होऊ शकेल.”

एंजल वन लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. दिनेश ठक्कर म्हणाले की,“आम्ही या वर्षाच्या सुरूवातीला सुपर अॅप १०० टक्के कार्यरत केला. मोबाइल अॅप्स आपल्या आयुष्यात तसेच गुंतवणूकदार आणि व्यापाऱ्यांसाठी कशा प्रकारे आवश्यक आहेत या संकल्पनेतून तो तयार करण्यात आला आहे. #सुपरइजहियर मोहीम आमच्या सुपरअॅपसाठी संपूर्ण भारतभरात जागरूकता आणि आकर्षण निर्माण करेल.”

ऑनलाइन ट्रेडिंग आणि गुंतवणूक, सॉवरेन गोल्ड बॉन्ड्स, एनसीडी आणि बरेच काही देणारा एक वन स्टॉप शॉप असलेले एंजल वन सुपर अॅप व्यक्ती, व्यापारी आणि गुंतवणूकदार अशा विविध प्रकारच्या ग्राहकांना सेवा देते. त्यातून अत्यंत सहजपणे खाते उघडता येते आणि वन क्लिक बँक अपडेशनही शक्य होते. खाते उघडल्यानंतर ग्राहकाला एक वैयक्तिकीकृत होमपेज मिळते आणि एकाच टॅपवर सर्व पाहता येते. वेगवान चार्टिंग आणि ऑर्डर देता येते. त्यामुळे दर समोर दिसतात आणि पारदर्शकता सांभळली जाते. ते पीअँडएल, फंड्स आणि ऑर्डर स्थितीवर ऑफलाइन पद्धतीने डेटा पाहू शकतात.


Back to top button
Don`t copy text!