
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा

स्थैर्य, फलटण, दि.२१ : फलटण येथील अण्णा भाऊ साठे नगर येथे गटाराचे पाणी रस्त्यावर येत असून त्या मुळे तेथील राहणाऱ्या नागरिकांना आतोनात हाल सहन करावे लागत आहेत. तरी फलटण नगरपालिकेने या वर त्वरित कार्यवाही करून समंधित गटाराचे तात्पुरत्या स्वरूपात तरी काम करून प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी तेथील रहिवाश्यांमधून होत आहे.
