
थेट WhatsApp वर मिळवा
दैनिक स्थैर्य | दि. २७ जानेवारी २०२४ | फलटण |
येथील मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये प्रतिवर्षी देण्यात येणार्या २०२३ – २०२४ सालचा आदर्श शिक्षक पुरस्कार अमोल नाळे यांना देऊन सन्मानित करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा फलटण एज्युकेशन सोसायटीचे सचिव श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते अमोल नाळे यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
यावेळी माजी नगरसेवक किशोरसिंह नाईक निंबाळकर, युवा उद्योजक तुषार नाईक निंबाळकर, प्रशालेचे प्राचार्य बाबासाहेब गंगावणे, वरद आर्ट्सचे सर्वेसर्वा महेश उर्फ गोटू सुतार यांच्यासह विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
मुधोजी हायस्कूल येथील अमोल नाळे यांचे काम कौतुकास्पद असून आदर्श शिक्षक पुरस्काराला साजेसे असेच काम ते करत आहेत. आगामी काळामध्ये सुद्धा अमोल नाळे यांचे काम नक्कीच गौरवास्पद असेल, असे मत यावेळी श्रीमंत संजीवराजे यांनी व्यक्त केले.
