
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. ०४ नोव्हेंबर २०२४ | फलटण | फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये आज अर्ज माघारी घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निवडणुकीमध्ये असलेल्या उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली.
– फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये उमेदवार निहाय चिन्हे पुढीलप्रमाणे –
-
चव्हाण दीपक प्रल्हाद – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार – तुतारी वाजवणारा माणूस
-
प्रतिभाताई शेलार – बहुजन समाज पार्टी – हत्ती
-
सचिन सुधाकर पाटील – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – घड्याळ
-
आगवणे दिगंबर रोहिदास – राष्ट्रीय समाज पक्ष – शिट्टी
-
प्रा. रमेश तुकाराम आढाव – स्वाभिमानी शेतकरी संघटना – रोड रोलर
(प्रा. रमेश तुकाराम आढाव हेच फलटण तालुका संविधान संघर्ष समितीचे अधिकृत उमेदवार आहेत.)
-
दीपक रामचंद्र चव्हाण – सनय छत्रपती शासन – ट्रंपेट
-
सचिन जालिंदर भिसे – वंचित बहुजन आघाडी – गॅस सिलेंडर
-
अमोल महादेव करडे – ऑटो रिक्षा
-
ॲड. कांचनकन्होजा खरात – हिरा
-
कृष्णा काशिनाथ यादव – बॅटरी टॉर्च
-
गणेश नंदकुमार वाघमारे – ऊस शेतकरी
-
चंद्रकांत उर्फ सचिन भालेराव – बॅट
-
नितीन भानुदास लोंढे – टेबल
-
सूर्यकांत मारुती शिंदे – ग्रामोफोन
