अजिंक्यतारा शेतकर्‍यांना किफायतशीर दर देण्यासाठी कटीबध्द


गव्हाणीत ऊसाची मोळी टाकून गळीत हंगामाचा शुभारंभ करताना आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, श्रीमंत छ. सौ. वेदांतिकाराजे भोसले, सर्जेराव सावंत व मान्यवर… 

आ. शिवेंद्रसिंहराजे; कारखान्याच्या ३७ व्या गळीत हंगामाचा उत्साहात शुभारंभ : कोरानाच्या पार्श्‍वभुमीतही १८ टक्के बोनसमुळे कामगार, कर्मचार्‍यांची दिवाळी गोड

स्थैर्य, सातारा, दि. 21 : स्व. भाऊसाहेब महाराजांनी तालुक्यातील जनतेच्या साक्षीने आणि सहकार्याने उभारलेल्या अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचे आज भल्या मोठ्या वटवृक्षात रुपांतर झाले आहे. आज जिल्ह्यात नव्हे तर राज्यात आर्थिकदृष्ट्‌या एक भक्कम आणि सक्षम सहकारी संस्था म्हणून कारखान्याला ओळखले जात आहे. सभासद शेतकरी आणि कामगार वर्गाचे सहकार्य, संचालक मंडळाचे काटकसरीचे धोरण यामुळेच आज आपल्या संस्थेचा नावलौकीक आहे. शासनाने इथेनॉलनिर्मीती बाबत घेतलेले धोरण सकारात्मक असून आपला कारखानाही इथेनॉल निर्मीतीसाठी प्राधान्य देत असून त्यातून संस्थेचे उत्पन्न वाढत आहे आणि पर्यायाने ऊस पुरवठादार शेतकर्‍यांना चांगला दर देता येत आहे. चालू गळीत हंगामातही अजिंक्यतारा कारखाना शेतकर्‍यांना किङ्गायतशीर दर देण्यासाठी कटीबध्द राहील, अशी ग्वाही कारखान्याचे मार्गदर्शक संचालक श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.

अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या ३७ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ बॉयलर अग्निप्रदीपन आणि गव्हाणीत ऊसाची मोळी टाकून उत्साहात पार पडला. याप्रसंगी आ. शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. यावेळी श्रीमंत छ. सौ. वेदांतिकाराजे भोंसले, चेअरमन सर्जेराव सावंत, व्हा. चेअरमन विश्‍वास शेडगे यांच्यासह विविध मान्यवर आणि संचालक उपस्थित होते. सध्या कोरोना महामारीमुळे अनेक संसार उध्वस्थ झाले आहेत. बिकट आणि गंभीर परिस्थिती असली तरी कामगार, कर्मचारी हे कारखान्याचा कणा आहेत, हे विसरून चालणार नाही. कारखाना प्रगतीपथावर नेण्यासाठी त्यांचे योगदान मोलाचे असून त्यांची दिवाळी गोड करण्यासाठी संचालक मंडळाने कामगार कर्मचार्‍यांना १८ टक्के बोनस देण्याचा निर्णय घेतला असल्याचे आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी यावेळी जाहिर केले. तसेच येत्या १ तारखेपासून रोख स्वरुपात एकरकमी कामगारांना बोनसची रक्कम वाटप केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

कामगारांचा पगार कधीही थकवला गेला नाही. त्यांना दरवर्षी बोनस दिला जातो. शेतकर्‍यांच्या ऊसाला एङ्गआरपीप्रमाणे सर्व रक्कम दिली जाते. यावरुनच संस्था किती सक्षम आहे हे सिध्द होते आणि त्यामुळेच संस्थेची विश्‍वासहर्ता वाढली आहे. चालू गळीत हंगामातही राज्य सरकारच्या सुचनांचे पालन करुन जिल्ह्यातील इतर कारखाने ज्या प्रमाणात पहिली उचल देतील त्यानुसार आपलाही कारखाना चांगला निर्णय घेईल आणि नेहमीप्रमाणे एङ्गआरपीनुसार गाळपासाठी येणार्‍या ऊसाला दर देईल यात कोणी शंका बाळगण्याचे कारण नाही, असेही आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी स्पष्ट केले.  

गेल्या १० ते १२ वर्षांत अजिंक्यतारा कारखान्याने प्रगतीचा आलेख सातत्याने चढता ठेवला असून संस्थेने सभासद, कामगार, ऊस तोडणी कामगार, वाहतूक यंत्रणा या सर्वांचीच विश्‍वासाहर्ता वाढवली आहे. याचे कारण म्हणजे कारखाना पुर्ण क्षमतेने आणि सक्षमतेने सुरु असून येणार्‍या ऊसाला वेळेत आणि एङ्गआरपीप्रमाणे दर दिला जात आहे. शासनाच्या निकषानुसार ऊसाची पहिली उचल १५ दिवसांत बंधनकारक आहे. मात्र महाराष्ट्रातील एकमेव आपलाच कारखाना आहे ज्याने गेल्या हंगामात १० दिवसांत पहिली उचल अदा केली. तसेच हंगाम संपताच शेतकर्‍यांना एङ्गआरपीनुसार होणारी सर्व रक्कम अदा केली आहे. कोणत्याही बाबतीत कारखाना मागे पडला नाही. त्यामुळेच राज्याच्या सहकारी कारखानदारी क्षेत्रात एक विश्‍वसनीय नाव म्हणून अजिंक्यतारा कारखान्याकडे पाहिले जात आहे. सभासद, शेतकरी आणि कामगारांचे हित जोपासणारी संस्था आणि संस्था अडचणीत असेल तर, त्यासाठी जीवाचे रान करणारे सभासद आणि कामगार, कर्मचारी असे घट्ट नाते आपल्या कारखान्यात पहावयात मिळते. अनेक अडचणींवर मात करुन सस्था आज नावारुपास आली असून स्व. भाऊसाहेब महाराज यांचे आशिवार्द आणि आपणां सर्वांची मोलाची साथ यामुळेच अजिंक्यतारा कारखान्याची घोडदौड जोमाने सुरु आहे, असे शिवेंद्रसिंहराजे म्हणाले.

या गळीत हंगामासाठी ८ हजार ३४० हेक्टर ऊसाची नोंद झाली असून ६.५० लक्ष मे.टन गाळपाचे उद्दीष्ट ठेवले आहे. परंतु कमी कालावधीत जास्तीत जास्त गाळप करण्याचा मानस संचालक मंडळाचा असून जास्त वेळ न लावता लवकरात लवकर गाळप संपवण्याचा प्रयत्न केला जाणर आहे. नवीन मशिनरीमुळे रिकव्हरीमध्ये निश्‍चितपणे वाढ झाली आहे. दरम्यान, आपल्या कारखान्याची गाळप क्षमता आगामी काळात निश्‍चितपणे वाढवली जाणार असून यामध्ये कोणतीही अडचण येणार नाही. त्यामुळे कार्यक्षेत्रातील बाहेरच्या कारखान्यांना काहीप्रमाणात जाणारा सर्व ऊस आपल्या कारखान्यात गाळपास येईल. इथेनॉल निर्मीतीबाबत शासनाने चांगला निर्णय घेतला असून साखरेला उठाव नसल्याने हा पर्याय सहकारी साखर कारखान्यांसाठी चांगला ठरणार आहे. शासनाने इथेनॉललाही चांगला दर दिला आहे. त्यामुळे आपण ३५ लाख लिटर इथेनॉल निर्मीती करणार असून निर्यातीसाठी कंपन्यांशी करार करण्यात आला आहे.  यातून कारखान्याची आर्थिक बाजू अधिक सक्षम होणार असून पर्यायाने ऊस दर चांगला देता येणार आहे. हाही गळीत हंगाम आपल्या सर्वांच्या सहकार्याने नेहमीप्रमाणे यशस्वी होणार आहे. हंगाम यशस्वी करण्यासाठी नोंद केलेला संपुर्ण ऊस आपल्याच कारखान्याला गाळपासाठी द्यावा आणि हंगाम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन शिवेंद्रसिंहराजे यांनी यावेळी केले.

व्हा. चेअरमन शेडगे यांनी प्रास्ताविक आणि स्वागत केले. संचालक महेंद्र पवार यांनी आभार मानले कार्यक‘मास कार्यकारी संचालक संजीव देसाई, जिल्हा परिषद सदस्य प्रतीक कदम, माजी उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव, पंचायत समिती सभापती सौ. सरिता इंदलकर, उपसभापती अरविंद जाधव, सदस्य जितेंद्र सावंत, राहूल शिंदे, दयानंद उघडे, आनंदराव कणसे, छाया कुंभार, जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश बडेकर, सौ. कांचन साळुंखे, तालुका खरेदी विक‘ी संघाचे अध्यक्ष शिवाजी सावंत, उपाध्यक्ष नारायण साळुंखे, दिलीप ङ्गडतरे, सुनिल काटे, गणपतराव शिंदे, बाजार समितीचे सभापती विक‘म पवार, किरण साबळे पाटील, सतीश चव्हाण, ऍड. सुर्यकांत धनावडे, उत्तमराव नावडकर, अण्णाबापू सावंत, पंडीतराव सावंत, अरविंद चव्हाण, कामगार युनियचे अध्यक्ष धनवे, सरचिटणीस सयाजी कदम यांच्यासह अजिंक्य उद्योग समुहाचे सर्व आजी माजी संचालक, ऊस उत्पादक शेतकरी, सभासद, बिगर सभासद आणि कामगार कर्मचारी उपस्थित होते.    

 


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!