दुधेबावीत कृषीदूतांनी केले स्वच्छ दूध उत्पादनाविषयी मार्गदर्शन

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

स्थैर्य, कोळकी, दि. 16 डिसेंबर : दुधेबावी, ता. फलटण येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित कृषी महाविद्यालयातील चतुर्थ वर्षातील विद्यार्थी शेतकर्‍यांना मार्गदर्शन करण्यासाठी दाखल झाले आहेत.

या विद्यार्थ्यांनी दुध उत्पादक शेतकर्‍यांना पारंपारिक पद्धतीमध्ये आधुनिक तंत्राची जोड देऊन् स्वच्छ दुध उत्पादनावर कसे करावे याविषयी मार्गदर्शन केले. तयामध्ये त्यांनी शेतकर्‍यांबरोबर धारा काढताना घेतल्या जाणार्‍या स्वच्छतेविषयी माहिती सांगितली. स्वच्छता राखल्यानंतर होणारे फायदे समजून सांगितले. यावेळी दुध उत्पादक शेतकरी अमोल नाळे परिसरातील शेतकरी उपस्थित होते.
यासाठी प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण,

प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर, कार्यक्रम समन्वयक प्रा. निलिमा धालपे, कार्यक्रम अधिकारी प्रा. सुरेश साळुंखे, प्रा. नितिशा पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली कृषीदूत रामराजे कुलाळ, अभिषेक मोरे, ऋषिकेश ओंबासे, रोहित वाघमारे, प्रणव साळुंखे, झहीर मणेरी, श्रीराम मोहिते या कृषीदूतांनी सहभाग घेतला.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!