आफ्रिका करणार सीरम इंस्टीट्यूटचे 10 लाख डोस परत; कारण, कोरोना व्हेरिएंटवर प्रभाव नाही


स्थैर्य, दि.१७: दक्षिण आफ्रिकेने सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडीयाला (SII) त्यांनी पाठवलेले 10 लाख कोरोना लसीचे डोस परत घेण्यास सांगितले. मंगळवारी इकॉनॉमिक टाइम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालात हे उघड झाले आहे. यापूर्वी दक्षिण आफ्रिेकेने सांगिेतले होते की, ते आपल्या लसीकरण अभियानामध्ये एस्ट्राजेनेका लसीचा समावेश करणार नाहीत, कारण ते त्यावर प्रभावी ठरत नाही.

एसआयआय हे ऑक्सफोर्ड-एस्ट्राजेनेका लस तयार करत असून ते प्रमुख पुरवठादार म्हणून उद्यास येत आहे. मागील आवठवड्यात दक्षिण आफ्रिकेमध्ये पहिल्या फेरीचे 10 लाख डोस पोहचले असून बाकीचे पाच लाख डोस हे काही आठवड्यात पोहचणार होते. पण एसआयआयची एस्ट्राजेनेका लस ही तेथील कोरोना व्हेरिएंटवर प्रभावी ठरत नसून दक्षिण आफ्रिकेच्या आरोग्य मंत्रालयाने सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडीयाला आपली लस मागे घेण्यास सांगितले आहे.

आफ्रिका देणार जॉनसन अँड जॉनसन लस
दक्षिण आफ्रिकेने आतापर्यंत टीकाकरणाची सुरूवात केली नसून त्यांनी आपल्या आरोग्य कर्मचाऱ्याला जॉनसन अँड जॉनसन लस देण्याच्या निर्णय घेतला आहे. ही बातमी अशा वेळेला समोर आली आहे की ज्यावेळेला जागतिक आरोग्य संघटनेने एस्ट्राजेनेकाची कोरोना लसीच्या कोव्हीशील्डला जगात कुठेही वापरण्यास मान्यता दिली आहे.


Back to top button
Don`t copy text!