अ‍ॅड. दशरथ नारायण घनवट यांचे वृद्धापकाळाने निधन

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

 

स्थैर्य, फलटण दि. २६ : फलटण वकील संघातील ज्येष्ठ विधीज्ञ अ‍ॅड. दशरथ नारायण घनवट यांचे वयाच्या 70 व्या वर्षी नुकतेच पिंप्रद, ता. फलटण येथील राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले.

फलटण न्यायालयातील प्रधान न्यायाधीश न्या. यु. एम. वैद्य आणि न्या. के. के. पाटील, फलटण वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. राहुल कर्णे, उपाध्यक्ष अ‍ॅड. राहुल बोराटे, सर्व पदाधिकारी, सभासद यांनी अ‍ॅड. घनवट यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यावेळी अ‍ॅड. नरसिंह निकम, अ‍ॅड. रामकृष्ण धुमाळ, अ‍ॅड. जावेद मेटकरी वगैरेंनी अ‍ॅड. घनवट यांच्या आठवणींना उजाळा देत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

फलटण बाजार समीतीचे माजी चेअरमन बी. के. निंबाळकर यांचे निधन

स्व. अ‍ॅड. डी. एन. घनवट यांनी फलटण, सातारा, बारामती, पुणे या न्यायालयात गेली सुमारे 40 वर्षे उत्तम प्रकारे वकिली व्यवसाय केला, ते दिवाणी कामातील दिग्गज व्यक्तिमत्व होते. त्यांच्या जाण्याने फलटण वकील संघाचे कुटुंबातील एक अनमोल रत्न गमावल्याची भावना व्यक्त करताना वकील संघात पोकळी निर्माण झाल्याचे मत फलटण वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. राहुल कर्णे यांनी व्यक्त केले आहे.

हे देखील वाचा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
कॉपी करू नका..!