
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । दि. १९ फेब्रुवारी २०२२ । सातारा । येथील राजवाडा परिसरात जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती स्थानिकांकडून मिळताच पोलिसांनी कारवाई करत ७६५ रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त केले. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा येथील राजवाडा परिसरात असणाऱ्या गुरांच्या दवाखान्या जवळील मोकळ्या जागेत महेश सूर्यकांत बल्लाळ वय ५३ रा. अंजली कॉलनी शाहुपुरी सातारा आणि चंद्रमणी धनंजय आगाने रा. गणेश चौक कोडोली सातारा या दोघांकडून पोलिसांनी ७६५ रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले.
