
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा

स्थैर्य, फलटण : अयोध्या येथील प्रभू श्रीराम मंदिराचे भूमिपूजन असल्याबद्दल फलटण येथे कडक बंदोबस्त तैनाद करण्यात आला होता. त्या वेळी जिंती नाका येथे मलठण येथील सागर अशोक जाधव हा आपले ताब्यातील होंडा सि डी डिलक्स मोटार सायकल वेडी वाकडी चालवत होता. त्याची वैद्यकीय चाचणी केली असता तो दारू प्राशन करून गाडी चालवीत असल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले. त्या बद्दल त्याच्या विरोधात फलटण शहर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झाला आहे, अशी माहिती फलटण शहर पोलीस निरीक्षक प्रताप पोमण यांनी दिली.
