
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । दि.०२ फेब्रुवारी २०२२ । सातारा । धनगरवाडी कोडोली येथे अवैध दारू विक्री केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. देशी दारू दुकानाच्या पाठीमागे दारु विक्री सुरु असल्याची स्थानिकांकडून माहिती मिळाल्यानंत ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी मनोज प्रकाश साळुंखे वय ३0 रा. देगाव ता,सातारा, प्रशांत सर्जेराव कीर्तीकुडव रा. कोडोली ता सातारा यांच्याकडून १ हजार ६८0 रुपये किंमतीच्या देशी दारुच्या २८ बाटल्या जप्त करुन सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
