राजुरी येथे चोरीत सुमारे १ लाख ४० हजारांचा मुद्देमाल लंपास

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक स्थैर्य | दि. २९ मार्च २०२३ | फलटण |
राजुरी (ता. फलटण) मधील पिसाळ मळा येथील प्रल्हाद शंकर पिसाळ यांच्या घरातून दि. २६ मार्च रोजी रात्री २.०० वाजता अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून सुमारे १ लाख ४० हजारांचा मुद्देमाल लंपास केल्याची फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, राजुरी (ता. फलटण) गावच्या हद्दीत पिसाळ मळा येथील फिर्यादी प्रल्हाद पिसाळ यांच्या राहत्या उघड्या घरात अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून लेंग्याच्या खिशातील ४०,०००/- व सुटकेसमधील १,००,०००/- रात्री ०२.०० वाजण्याच्या सुमारास घरातील लाईट गेल्याने त्याला जाग आली. त्यानंतर पिसाळ यांना दोघे जण इसम त्यांच्या उशीजवळ दिसले. त्यावेळी त्यांना वाटले की, त्यांचा नातू आला असावा, म्हणून त्यांनी आवाज दिला. त्यावेळी त्यांना आवाज न देता ते चोरटे घरातून निघून गेले. त्यानंतर फिर्यादी उठून त्यांच्या पाठीमागे घराचे बाहेर आले असता ते दोघे पळून जात असताना त्यांना दिसले. त्यांनी आतील घरामध्ये जाऊन पाहिले असता घरातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसले. त्यावेळी त्यांना घरातील सुमारे १ लाख ४० हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केल्याचे आढळून आले.

याबाबत पिसाळ यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात चोरीची फिर्याद दाखल केली असून अधिक तपास पो. ना. काशीद करत आहेत.

Back to top button
Don`t copy text!