ताथवडा येथे एकास कुर्‍हाडीने मारहाण; सहाजणांवर गुन्हा दाखल

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक स्थैर्य | दि. २९ मार्च २०२३ | फलटण |
ताथवडा (ता. फलटण) येथे पूर्ववैमनस्यातून एकास कुर्‍हाडीने मारहाण करण्यात आली आहे. या मारहाणीत फिर्यादी व्यंकट विनायक शिंदे (वय ६०, रा. ताथवडा) हे जखमी झाली असल्याचा गुन्हा फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे.

या प्रकरणी तुकाराम विनायक शिंदे, माणिक विनायक शिंदे, चंद्रभागा माणिक शिंदे, मंगल तुकाराम शिंदे, किशोर नामदेव शिंदे, संदीप माणिक शिंदे (सर्व राहणार ताथवडा, तालुका फलटण, जिल्हा सातारा) यांच्या गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी, ताथवडा, तालुका फलटण येथे फिर्यादी व्यंकट विनायक शिंदे (वय ६० वर्ष) यांच्या घरासमोर दि. २६/०३/२०२३ रोजी सायंकाळी ०६.०० वाजण्याच्या सुमारास वरील आरोपींनी बेकायदेशीर जमाव करून यातील फिर्यादी यांचेसोबत सतत वाद का करतो, असे म्हणून यातील आरोपी तुकाराम विनायक शिंदे यांनी काठीने व आरोपी माणिक विनायक शिंदे यांनी कुर्‍हाडीने मारहाण करून तक्रारदार यास जखमी केले व इतरांनी हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ, दमदाटी केली म्हणून त्यांचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस फौजदार सुभाष जगन्नाथ शिंदे करत आहेत.

Back to top button
Don`t copy text!