
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. 13 जुलै 2024 | फलटण | येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयातील शिरस्तेदार अभिजीत सोनवणे यांची नायब तहसीलदारपदी पदोन्नती झाली असून पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथे नियुक्ती करण्यात आली आहे.
अभिजीत सोनवणे यांच्या निवडीबद्दल फलटणचे प्रांताधिकारी सचिन ढोले, तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव यांच्यासह फलटण उपविभागीय अधिकारी कार्यालय व तहसीलदार कार्यालयातील सर्वांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
