
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा

स्थैर्य, सातारा, दि.२६: सातारा शहरातील उपनगर असलेल्या देगाव फाटा येथे बुधवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घालत तब्बल 9 दुकाने फोडली. ही बाब गुरुवारी सकाळी समोर आल्यानंतर परिसर हादरून गेला. या घटनेची माहिती शहर पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, चोरटे सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाले आहेत.
लॉकडाउनसंबंधी अजित पवारांचं मोठं विधान, म्हणाले…
प्राथमिक माहितीनुसार, चोरट्यांनी वेगवेगळ्या दुकानांची शटर कटावनीसारख्या शस्त्राने वाकवून आत प्रवेश केला. अशा प्रकारे दुकानांतून लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरी झाल्याची शक्यता निर्माण झाली आहे. पोलिसांचा घटनास्थळी पंचनामा सुरू होता.
