सातार्‍यातून एक मोटारसायकल लंपास

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

  

स्थैर्य, सातारा, दि. 30 : येथील मंगळाई देवी मंदिरासमोरील पाण्याच्या टाकीजवळ लावलेली मोटारसायकल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. याबाबत माहिती अशी, केसरकर पेठेत राहणारे दत्तात्रय नामदेव सूळ यांनी मंगळाई देवीसमोर असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ 20 हजारांची मोटरसायकल एमएच 11 एन 3501 पार्क केली होती. अज्ञात चोरट्याने दि. 25 रोजी 11.30 ते 11.40च्या दरम्यान चोरून नेली. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून सहायक फौजदार एस. ई. पवार तपास करत आहेत. 

क्षेत्र माहुली येथे एकास दांडक्याने मारहाण 

सातारा, दि. 30 : क्षेत्र माहुली, ता. सातारा येथे एकास अज्ञातांनी दांडक्याने मारहाण केली. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत माहिती अशी, धनराज अधिकराव जाधव हे मर्चंट नेव्हीमध्ये काम करतात. ते सध्या क्षेत्र माहुली येथे गावी आहेत. ते दि. 29 रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास गोठ्यात काम करत असताना अचानक अज्ञातांनी तेथे येवून धनराज जाधव यांना दांडक्याने मारहाण करून शिवीगाळ केली. यानंतर धनराज जाधव घरी आले. यावेळी संशयीतांचे चुलते यांनीही घरी आले आणि धनराज जाधव यांना जीवे मारण्याची धमकी देत शिवीगाळ केली.

हे देखील वाचा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
कॉपी करू नका..!