दैनिक स्थैर्य | दि. २४ ऑक्टोबर २०२३ | फलटण |
खामगाव (ता. फलटण) गावच्या हद्दीत मुरूम रस्त्याला असणार्या गोसावी वस्ती जवळील वॉशिंग सेंटरजवळ मंगळवारी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास ‘तू माझ्यासोबत रात्री भांडण का केले’, असे म्हणून शिवीगाळ, दमदाटी करत हातात असणार्या कोयत्याने मारहाण करून उमेश नामदेव घाडगे (वय २८, रा. गोसावीवस्ती, खामगाव, मुरूम रोड, ता. फलटण) यास जखमी केले.
या मारहाणप्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली असून विकास प्रकाश गोसावी (रा. गोसावीवस्ती, खामगाव, ता. फलटण) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी अधिक तपास सहा. फौजदार एम. आर. हांगे करत आहेत.