खासदार रणजितसिंह यांना निवडून आणण्यासाठी कार्यरत राहणार; ना. अजितदादांच्या आदेशाचे पालन : श्रीमंत शिवरूपराजे


दैनिक स्थैर्य | दि. 01 मे 2024 | फलटण | माढा लोकसभा मतदारसंघांमधून महायुती अर्थात भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व शिवसेना यांचे अधिकृत उमेदवार असलेले विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना निवडून आणण्यासाठी आम्ही कार्यरत राहणार आहोत. आमचे नेते उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या आदेशान्वये आम्ही खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारात सक्रिय झालो आहोत; अशी माहिती सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर यांनी दिली.

महायुतीच्या संयुक्तिक बैठकीनंतर श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर बोलत होते.

यावेळी बोलताना खर्डेकर म्हणाले की; माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वामध्ये कार्यरत असलेला गट हा महायुती सोबतच आहे. महायुतीचा उमेदवार निवडून येण्यासाठी आम्ही सर्वजण कार्यरत आहोत. फलटण शहरासह तालुक्यामध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून अनेक विकास कामे मार्गी लागलेली आहेत. त्यामुळे आगामी काळात सुद्धा फलटण विकासाच्या मार्गावर चालण्यासाठी आम्ही अजितदादांच्या सोबतच आहोत.

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर यांचा फलटण पूर्व भागामध्ये दांडगा जनसंपर्क आहे. यासोबतच त्यांना मानणारा वर्ग सुद्धा फलटण तालुक्याच्या पूर्व भागात मोठ्या प्रमाणावर आहे. श्रीमंत शिवरूराजे यांच्या या निर्णयामुळे नक्कीच फलटण पूर्व भागांमधून निर्णायक बदल आगामी काळामध्ये बघायला मिळणार आहे; असे मत जाणकार व्यक्त करीत आहेत.


Back to top button
Don`t copy text!