अयोध्येच्या मंगल कलश अक्षतांची खासदार रणजितसिंह यांच्या उपस्थितीत भव्य मिरवणूक संपन्न

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य | दि. 17 डिसेंबर 2023 | फलटण | श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या, विश्व हिंदू परिषद जिल्हा सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने फलटण येथे अयोध्येतून फलटण येथे आलेल्या मंगल कलश अक्षतांची भव्य मिरवणूक खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रभू श्रीराम मंदिर येथून शुभारंभ करण्यात आला. यावेळी “प्रभू श्रीरामचंद्र कि; जय” “जय श्रीराम; जय श्रीराम” अश्या घोषणा देत परिसर दुमदुमला होता.

अयोध्येतून फलटण येथे आलेल्या मंगल कलश अक्षतांची भव्य मिरवणूक हि श्रीराम मंदिर, नरसिंह चौक, उघडा मारुती मंदिर, रविवार पेठ, छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, महावीर स्तंभ, क्रांतिसूर्य महात्मा फुले चौक, श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर चौक, श्री गणपती मंदिर स्वामी विवेकानंद नगर येथे मिरवणुकीचा समारोप झाला.

सदरहू मिरवणुकीचे आयोजन फलटण तालुका संयोजक श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र आयोध्या द्वारा विश्व हिंदू परिषद व बजरंग दल फलटण तालुका यांच्यावतीने करण्यात आले होते. यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी फलटणचे आराध्य दैवत प्रभू श्रीराम यांचे दर्शन घेऊन अयोध्या येथे होत असलेल्या प्रभू श्रीराम मंदिरास शुभेच्छा फलटणकरांना दिल्या.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!