अंतराळात पाठवली जाणार भगवद्गीतेची प्रत आणि पंतप्रधान मोदींच्या फोटोसह २५ हजार भारतीय लोकांची नावे

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

स्थैर्य,नवी दिल्ली, दि.१५: एक उपग्रह फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस अंतराळात प्रक्षेपित करण्यात येणार आहे. सर्वाधिक विश्वसनीय असलेल्या ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण यानाने म्हणजेच पीएसएलव्ही सी-५१ ने भारतीय अंतराळ आणि संशोधन संस्था (इस्रो) इतर दोन खासगी उपग्रहांसोबत सएडी सॅट अवकाशात सोडणार आहे. यावेळी भगवद्गीतेची एक प्रत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोसह २५ हजार भारतीय लोकांची नावे अंतराळात पाठवणार आहे.

फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस खासगी क्षेत्रातील पहिला उपग्रह सतीश धवन सॅटलाइटसोबत (सएडी सॅट) अंतराळात सोडण्यात येणार आहे. अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था असणाऱ्या नासाकडून यापूर्वी अनेकदा अशा प्रकारे लोकप्रिय व्यक्तींच्या नावांची यादी अंतराळात पाठवण्यात आली आहे. आता भारताकडूनही हा ट्रेण्ड फॉलो केला जात आहे.

भगवद्गीता आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो यासह पाठवल्या जाणाऱ्या २५ हजार नावांमध्ये बहुतांशी नावे ही विद्यार्थ्यांची असतील, असे सांगितले जात आहे. यासंदर्भात स्पेसकिड्स इंडियाच्या संस्थापिका आणि कार्यकारी अध्यक्ष असणाऱ्या डॉ. केसन यांनी दिलेल्या माहितीनुसार, आपण या उपग्रहाच्या प्रक्षेपणासंदर्भात खूप उत्साही असल्याची माहिती दिली. आमच्या कंपनीचा अंतराळात जाणारा हा पाहिला उपग्रह असणार आहे. अमेरिकेतील अंतराळ मोहिमांप्रमाणे या मोहिमेमध्ये भगवद्गीतेची प्रत पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव आणि फोटोही याचसोबत या उपग्रहाच्या पुढील पॅनलवर आत्मनिर्भर मोहिमेसोबत जोडून लावण्यात आला आहे. हा उपग्रह पूर्णपणे भारतीय बनावटीचा आहे.

सतीश धवन सॅटलाइटसोबत खासगी क्षेत्रातील पहिला उपग्रह अंतराळात सोडण्यात येणार आहे. एसडी सॅटची निर्मिती करणाऱ्या चेन्नईमधील स्पेसकिड्स या कंपनीचे तांत्रिक विभागाचे प्रमुख रिफत शाहरुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, साडेतीन किलो वजनाच्या या नॅनो उपग्रहामध्ये एक अतिरिक्त चिप लावण्यात आली असून, त्यामध्येच ही नावे असणार आहे. या नॅनोसॅटेलाइटला भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे संस्थापक असणाऱ्या सतीश धवन यांचे नाव देण्यात आले आहे. अंतराळ विज्ञानाची गोडी विद्यार्थ्यांमध्ये वाढावी या हेतूने हा उपग्रह अंतराळात पाठवण्यात येणार असल्याचे स्पेसकिड्सकडून सांगण्यात आले.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!