पत्नीला न्यायला आलेल्या पतीवर कोयता हल्ला सासऱ्यासह दोन मेव्हण्यांवर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक स्थैर्य । दि. २८ नोव्हेंबर २०२२ । सातारा । पत्नीला न्यायला आलेल्या एकावर कोयत्याने हल्ला करून जखमी केल्याप्रकरणी सासरा व दोन मेहुणे अशा तिघांवर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत विठ्ठल शिवाजी पवार (वय 22, रा. कोळकी, शारदानगर, ता. फलटण) यांनी फिर्याद दिली. त्याचा सासरा तुकाराम जासन्या काळे, मेहुणे जिंदाल तुकाराम काळे, अजय तुकाराम काळे (रा. दातेवस्ती, ता. फलटण) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. गुरुवार दि. 24 रोजी सायंकाळी चारच्या सुमारास दातेवस्ती येथे पत्नी कोमल हिला घेऊन जा, असा फोन आल्याने विठ्ठल हा सासरे तुकाराम काळे यांच्या घरासमोर गेला असता सासर्‍याने त्याच्यावर कोयत्याने हल्ला केला.
यावेळी एका मेहुण्याने दांडक्याने मारहाण केली, तर दुसर्‍या मेहुण्याने पोटावर चाकूने वार केले. यावेळी भांडण सोडवण्यासाठी मध्ये आलेला फिर्यादीचा भाऊ रोहन पवार यालाही संशयितांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तपास उपनिरीक्षक कदम करत आहेत.

Back to top button
Don`t copy text!