
दैनिक स्थैर्य । दि. २८ नोव्हेंबर २०२२ । सातारा । सातारा कारागृहात दोन बंदीवानांनी एकास मारहाण केल्याप्रकरणी दोघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 26 नोव्हेंबर रोजी सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील सर्कल क्रमांक दोन या ठिकाणी अक्षय संभाजी आढाव, अजय संजय आढाव या बंदीवानांचा झोपण्याच्या जागेवरून सागर किसन पार्टॆ या बंदीवानाशी शाब्दिक वाद झाला होता. त्याचा राग मनात धरून अक्षय आढाव आणि अजय आढाव यांनी सागर पार्टॆ यास वीट व फरशीच्या तुकड्याने पोलिसांसमोर मारहाण केली. या घटनेची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात झाली असून संबंधितांवर गुन्हा दाखल झाला आहे.