दैनिक स्थैर्य । दि. २६ सप्टेंबर २०२२ । फलटण । आदर्की, ता. फलटण येथे मारहाण केल्याप्रकरणी एकावर लोणंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. २३ सप्टेंबर रोजी ७.३० वाजण्याच्या सुमारास आदर्की येथे तेथीलच अभिजीत मधुकर बोडके याने माझी जमीन वाटून दे, असे म्हणत राकेश मधुकर बोडके याला मारहाण करून त्याच्या दंडाला व छातीचा चावा घेतला. तसेच फिर्यादी राकेश बोडके याची आई सौ सुभद्रा व वडील मधुकर यांनाही शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार लोणंद पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.