अ. भा. शिक्षक संघ फलटण शाखा पदाधिकारी नियुक्त्या जाहीर : नव नियुक्तांचे अभिनंदन


दिलीप मुळीक व सतीश जाधव.

स्थैर्य, फलटण दि. २२ : अखिल भारतीय शिक्षक महासंघांतर्गत फलटण तालुका शाखेचे नूतन पदाधिकारी व कार्यकारिणी निवडीसाठी आयोजित मेळाव्यात अखिल भारतीय शिक्षक महासंघाचे कोषाध्यक्ष सिध्देश्वर पुस्तके यांनी शिक्षक संघाचे नूतन पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्यांच्या नावाची घोषणा केल्यानंतर उपस्थितांनी सर्व नवनिर्वाचितांचे अभिनंदन करुन त्यांना शुभेच्छा दिल्या. शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र जानुगडे अध्यक्षस्थानी होते. सिद्धेश्वर पुस्तके यांनी केलेल्या घोषणे नुसार तालुकाध्यक्ष दिलीपराव मुळीक, नेते नवनाथ गावडे, सरचिटणीस सतिश जाधव, कार्याध्यक्ष हनुमंत चिंचकर, कोषाध्यक्ष सागर लोंढे यांच्या निवडीची घोषणा झाली. यावेळी तालुका संपर्क प्रमुख सचिन यादव, कार्यालयीन चिटणीस अमित जाधव, प्रसिद्धी प्रमुख रमेश काशीद यांच्या नियुक्तत्याही जाहीर करण्यात आल्या.

फलटण तालुका शिक्षक संघाचे विभागीय उपाध्यक्ष म्हणून संजय भांडवलकर, भानुदास सोनवलकर, मधुकर शिंदे, किशोर चांदगुडे, विष्णू नाळे यांच्या नावाची घोषणाही करण्यात आली. यावेळी सातारा जिल्हा शिक्षक संघाच्या जिल्हा संपर्क प्रमुखपदी कुंडलीक जाधव, जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण शिंदे, 

सचिन गुरव या पदांची घोषणाही करण्यात आली.

या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य शिक्षक संघाचे सल्लागार रा. बा. लावंड (बापु), शिक्षक संघाचे माजी जिल्हाध्यक्ष मच्छीद्र मुळीक, जिल्हा शिक्षक संघाचे नेते सुरेशराव गायकवाड, शिक्षक बॅकेचे गट नेते मोहन निकम, सातारा जिल्हा परिषद शिक्षण कमिटी तज्ञ सदस्य रुपेश जाधव, जिल्हा कार्यालयीन चिटणीस प्रविण घाडगे, शिक्षक बॅकेचे विद्यमान संचालक अनिल शिंदे, भगवान धायगुडे, आदी मान्यवर उपस्थित होते . 

या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी जिल्हा सरचिटणीस राजेंद्र बोराटे, बँकेचे विद्यमान संचालक अनिल शिंदे, मावळते तालुकाध्यक्ष लालासो भंडलकर, मावळते कोषाध्यक्ष सतिश जाधव, माजी संचालक सिकंदर शेख, माजी संचालक विक्रम दिवटे, जिल्हा नेते शशिकांत सोनवलकर, बाळकृष्ण मोरे, लक्ष्मण शिंदे, गंगाराम काटकर यांनी परिश्रम घेतले.

प्रारंभी माजी अध्यक्ष लालासाहेब भंडलकर यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत व मान्यवरांचे सत्कार केल्यानंतर प्रास्तविकात संघटनेच्या कामकाजाचा आढावा घेतला, मेळाव्याचा उद्देश स्पष्ट केला. समारोप व आभार संचालक अनिल शिंदे यांनी मानले. सुञसंचालन जिल्हा सरचिटणीस राजेंद्र बोराटे व जिल्हा उपाध्यक्ष इम्तियाज तांबोळी यांनी केले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!