मंत्री महोदयांनी सुद्धा पंढरपूरला न येता स्थानिक अधिकार्‍यांद्वारे प्रातिनिधिक पूजा करावी : अक्षय महाराज भोसले


 

स्थैर्य, फलटण, दि. २१ : आषाढी वारीनंतर आता कार्तिकिलाही वारकरी व भक्तांना पंढरपूरात प्रवेश न देण्याची शासनाची भूमिका असून त्याप्रमाणे सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात येत असताना मंत्री महोदयांनी सुद्धा पंढरपूरला न येता स्थानिक अधिकार्‍यांद्वारे प्रातिनिधिक पूजा करावी अशी अपेक्षा वारकरी सांप्रदाय युवा मंच राज्याध्यक्ष अक्षय महाराज भोसले यांनी व्यक्त केली आहे.

 

वारकरी सांप्रदाय कायमच सरकारी यंत्रणेला सहकार्य करत आला आहे. मात्र सरकार त्याच्याकडे गांभीर्याने पहात नाही, शासनाने किमान प्रत्येक मठात 30 ते 50 वारकर्‍यांना सर्व कोरोना प्रतिबंधात्मक काळजी घेत परवानगी निवासाची परवानगी द्यावी अशी मागणी करताना सध्या पदवीधर मतदार संघातील निवडणूकीबाबतीत राज्यभर प्रत्येक राजकीय पक्षांच्या बैठका सुरु आहेत. शेकडो कार्यकर्ते उपस्थित असतात तेंव्हा शासन यावर कसे अंकुश ठेवत नाही असा सवाल अक्षय महाराज भोलसे यांनी उपस्थित केला आहे. 

वारी व अध्यात्मिक काही आले की नियम लागू होतात, अशी दुटप्पी भावना सरकारने ठेऊ नये, आम्ही कायम सहकार्य करत आलो आहोत पुढे ही करणार आहोत असे सांगून संत गाडगेबाबा कधीच मंत्रालयाची पायरी चढले नव्हते. मंत्री महोदय त्यांच्या भेटीस मंत्रालयाबाहेर येऊन थांबत असत, एकेकाळी इतका आदर साधू संतांविषयी होता. आतां मात्र कुठलाच राजकीय पक्ष किंवा मायबाप सरकार प्रत्येक अध्यात्मिक गोष्टींकडे कानाडोळा करत आहे. आज सरसकट मॉल व मार्केटस सुरु आहेत तिथे कुठल्याही प्रकारची दक्षता न घेता हजारो लोक वावरतात तेंव्हा शासन तेथे निर्बंध लावत नाही. वारकरी सांप्रदाय येत्या काळात आपली नाराजी दाखवून देईल यात शंका नाही.

पोलिसांबाबत अत्यंत आदर बाळगत सांगू इच्छितो की, वारी बंदोबस्तासाठी1800 पोलीस तैनात केले आहेत त्याऐवजी जर किमान 1500 वारकरी येऊ दिले तर अडचण काय? निष्ठेने परंपरा व नियम सांभाळणारे वारकर्‍यांना आदराने पंढरपूरात येऊ द्यावे अन्यथा जसे वारकरी घरी आहेत तसे मंत्री महोदयांनी सुद्धा घरुनच पूजा करावी अशी मागणी वारकरी सांप्रदाय युवा मंचचे राज्याध्यक्ष अक्षय महाराज भोसले यांनी केली आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!