आपल्या खासदारांना हिंगणगाव जिल्हा परिषद गटातून 90 % मताधिक्य देणार : प्रल्हादराव साळुंखे – पाटील

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य | दि. 19 एप्रिल 2024 | फलटण | सातारा जिल्हा परिषदेच्या हिंगणगाव जिल्हा परिषद गटामधून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना म्हणजेच भारतीय जनता पार्टीला 90% मताधिक्य देणार असल्याची ग्वाही हिंगणगाव जिल्हा परिषद गटाच्या वतीने ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे – पाटील यांनी दिली.

हिंगणगाव येथे आयोजित बैठकीमध्ये प्रल्हादराव साळुंखे पाटील बोलत होते. यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती होती.

खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी फलटण तालुक्यामध्ये रखडलेला विकास पुन्हा एकदा सुरू केलेला आहे. फलटण तालुक्याच्या सुपुत्राला पुन्हा एकदा संसदेमध्ये पाठवून आपल्या तालुक्याची विकासगंगा अविरत वाहत ठेवण्यासाठी आपण सर्वांनी कार्यरत राहणे गरजेचे आहे. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी विविध शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवल्या आहेत. याचा फायदा सर्वसामान्य नागरिकांना होत आहे; असे मतही प्रल्हादराव साळुंखे – पाटील यांनी व्यक्त केले.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!